Dedicated to serving the people with honesty, progress and leadership.
"ताथवडेच्या मातीत जन्म घेतलेल्या माझ्यासाठी समाजाशी असलेली नाळ हीच माझी खरी ओळख आहे. लहानपणापासूनच संघर्ष, मेहनत आणि लोकांशी जुळलेला विश्वास यामुळे जीवनाचा प्रवास अधिक मजबूत होत गेला. तरुण वयात जीवनात अनेक प्रकारची कामे करत अनुभव घेतला. बिल्डिंग मटेरियल सप्लाय, कामगार सप्लाय, सेक्युरिटी सर्विस तसेच बांधकाम व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत काम करताना समाजातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणी आणि गरजा जवळून समजल्या. प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि जबाबदारी जपत लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. व्यवसायासोबतच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना कायम मनात होती. याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या समूहाला एकत्र करून 'जीविका फाऊंडेशन' ची स्थापना केली व त्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात झाली. वृक्षारोपण मोहिमा, विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाची मदत तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाशी असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे. कोविडसारख्या कठीण काळात ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील अनेक कुटुंबांना मदतीचा हात देताना माणुसकीचे खरे मूल्य अनुभवायला मिळाले. त्या काळात अन्न, औषधे, आरोग्य सुविधा आणि आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी जीविका फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले. हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आणि समाजकारणाला अधिक व्यापक दिशा मिळाली. ताथवडे येथे भव्य शिवसेना संपर्क कार्यालय उभारून ते पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुले करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक गरजू रुग्णांना मदत करण्याचे कार्य सुरू केले. रुग्णसेवा अधिक प्रभावी व्हावी यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका सेवेत उपलब्ध करून दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदत, आधार आणि विकास पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. लोकांनी दिलेला विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. पुढील काळातही समाजहित, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहीन, हीच माझी बांधिलकी."
— श्रीकांत भानुदास नवले शहरप्रमुख, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष, पिंपरी चिंचवड शहर
Better schools and digital classrooms.
Creating jobs and supporting businesses.
Strong safety and empowerment initiatives.
Affordable healthcare and medical services.
Video 1
Video 2
Video 3
Video 4
Video 5
Video 6
Video 7
Video 8
Video 9
Video 10
Share your concerns, suggestions, or support requests through our Citizen Support Form.